नागपूरमध्ये मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

December 18, 2015 9:09 PM0 commentsViews:

matang samaj12

18 डिसेंबर : विधानसभेवर धडकणार्‍या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जध्ये 70 जण जबर जखमी झाले आहेत. नागपूरच्या कस्तूरचंद चौकात ही घटना घडली आहे. काही आंदोलनकर्ते परिसरातील इमारतीमध्ये गेले असता. पोलिसांनी त्यांना बाहेर खेचून मारहाण केली.

नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याचनिमित्ताने राज्यभरातून इथं मोर्चे येत आहेत. विविध मागण्यांसाठी मातंग समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी नांदेडहून नागपूरपर्यंत हा पायी मोर्चा मातंग समाजानं काढला होता. या मोर्चात 150 जण सहभागी झाले होते. पण मुख्य चौकात जाण्याआधीच हा मोर्चा अडवला असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. त्यावरून पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. यामध्ये अनेकांना जबर दुखापत झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close