सज्जन कुमार यांच्यावर अटक वॉरंट

February 17, 2010 5:25 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी 1984च्या शीख विरोधी दंगलप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि इतर आरोपींविरोधात दिल्लीतील सेशन कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. सुनावणीच्या वेळी कोर्टापुढे हजर न राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आले आहे. तर दुसरीकडे दिल्ली हायकोर्टाने सज्जनकुमार यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे सज्जन कुमार यांना सीबीआय केव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावरही आरोप आहेत. दरम्यान या सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर शिखांनी जोरदार निदर्शने केली.

close