सोनिया, राहुल हाजीर हो !

December 19, 2015 1:24 PM0 commentsViews:

sonia rahul gandi3419 डिसेंबर : नॅशनल हेराल्ड प्रकऱणी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया आणि उपाध्यक्ष राहुल गांधी पाटियाला हाऊस कोर्टात हजर होणार आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार ते तीन वाजता जामीनासाठी अर्ज सादर करणार आहेत. सोनिया गांधी, राहुल यांच्यासह काँग्रेसचे सहा नेते कोर्टात हजर होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष पटियाला कोर्टाकडे आहे.

सोनिया, राहुल यांच्या समर्थनार्थ दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सरकारने सूडाचे राजकारण केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांचे संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. तर या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पाटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यावस्था तैनात करण्यात आलीये. कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठ फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

दिल्ली ते गल्ली काँग्रेस नेते रस्त्यावर

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी हेरॉल्ड प्रकरणी अडचणीत येताच काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहे. नवी दिल्ली, मुंबईसोबतच भोपाळ, वाराणसी आणि जयपूरमध्येही काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात रास्तारोको आंदोलन केलंय. पक्षाचे अनेक दिग्गज नेते यात सहभागी झाले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close