400 हॉटेल्सवर छापे, 42 जण ताब्यात

February 18, 2010 9:03 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीपुण्यातील बॉम्बस्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. पुणे पोलिसांनी आज 400 हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसवर छापे टाकले आहेत. त्याचबरोबर 42 सीमी कार्यकत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.काही संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ओळखपत्र असल्याशिवाय सायबर कॅफेत येणार्‍यांना नेटचा वापर करु देऊ नका, अशा सूचना सायबर कॅफेच्या मालकांना देण्यात आल्या आहेत. कोरेगाव पार्कमधून घटनेच्या दिवशी आणि नंतर जे फोन कॉल्स करण्यात आलेत ते कॉल्स ट्रेस करण्यात आलेत. यात आत्तापर्यंत 1लाख 10 हजार कॉल्स ट्रेस करण्यात आलेत. या कॉल्समध्ये बांग्लादेश, अमेरिका या ठिकाणचे कॉल्स आहेत.या कॉल्समधील संवादाचा तपशीलही तपासला जात आहे.

close