नाशिक : कारला भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

December 19, 2015 12:47 PM1 commentViews:

nashik car accident19 डिसेंबर : नाशिक वणी-कळवण मार्गावर शुक्रवारी रात्री 2च्या सुमारास कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. वणी-कळवण मार्गावर खांडेमळा गावाजवळ हा अपघात झालाय.

भरधाव वेगाने जाणार्‍या या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश : चुराडा झाला.

हे सर्व वणी गावातील रहिवासी आहेत. यात साहिल सय्यद, शकिल सय्यद, सचिन डोले, सनी गांगुर्डे आणि चालक साहिल झावरे हे 5 जण जागीच ठार झालेत. इम्रान शेख, रोशन खडाम, ज्ञानेश्वर धूम हे 3 जण जखमी झाले आहे. सर्व जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद वणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rohan Shinde

    Buy Fiat Punto, its tank for your own safety!

close