गोंदियात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

December 19, 2015 12:13 PM0 commentsViews:

vadala_rape_case19 डिसेंबर : गोंदियाच्या कामठा गावात एका 22 वर्षीय नराधमाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपी राजेश मेश्राम याला अटक करण्यात आलीये.

पीडित मुलगी ही घराशेजारी खेळत असताना आरोपीने तिला आपल्या दुचाकीवर बसवून घरा पासून थोड्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. घडलेला प्रकारा बद्दल पीडित मुलीने आपल्या वडलांना याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close