नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना जामीन

December 19, 2015 3:31 PM0 commentsViews:

soina and rahul gandhi19 डिसेंबर : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मंजूर झालाय. प्रत्येकी 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दोघांनाही पटियाला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणीही 20 फेब्रुवारी 2016 ला होणार आहे.

कोर्टाने कोणत्याही अटीविना हा जामीन मंजूर केला. अवघ्या 2 मिनिटांत या प्रकरणाची जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली. सोनिया आणि राहुल गांधी कोर्टात दाखल झाले आणि ताबडतोब त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. सोनिया गांधी यांना ए.के.अँटोनी गँरेंटर राहिले तर प्रियंका गांधी- वडेरा राहुल गांधींना गॅरेंटर राहिल्या.

यावेळी सोनिया आणि राहुल यांच्यासह मनमोहन सिंग, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसभवनात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. आमच्या विरोधात सरकार जाणूनबुजून करत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही अशी टीका राहुल गांधींनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close