डोंबिवलीमध्ये मनसेचं मुख्यमंत्र्यांविरोधात गाजर आंदोलन

December 19, 2015 5:34 PM0 commentsViews:

19 डिसेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीसाठी 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण त्यांनी हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या विशेष पॅकेज वरून घूमजाव केलाय. या प्रकरणी आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाजर आंदोलन करत सरकारचा निषेध केला.kdmc mns protest

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांसाठी या भागात विशेष पँकेज जाहीर केलं होतं. 6 हजार 500 कोटींचं पॅकेजची घोषणा प्रचारसभेदरम्यान करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या युटर्ननंतर त्यांच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये मनसेनं मुख्यमंत्र्यांविरोधात गाजर भेट आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना गाजरच भेट दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close