राणेंनी मागितली माफी

February 18, 2010 9:36 AM0 commentsViews: 5

18 फेब्रुवारीमहसूलमंत्री नारायण राणे यांनी आज कोर्टात बिनशर्त लेखी माफी मागितली. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा आदेश झुगारून राणे यांनी उपजिल्हाधिकार्‍यांच्या सेवासमाप्ती आदेशाला स्थगिती दिली होती.सिल्लोड इथले उपजिल्हाधिकारी संजीव कुमार मोरे यांचे टोकरी कोळी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले. त्यानंतर मोरे यांनी हायकोर्टात धाव घेतली. तिथेही त्यांच्या विरूध्द निकाल लागला. मग मोरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मोरे यांना सेवामुक्त करण्याचे आदेश काढले. या आदेशाविरूध्द मोरे यांनी तत्कालीन महसूलमंत्री राणे यांच्याकडे धाव घेतली. सरकारने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाची माहिती टिप्पणीसोबत दिलेली असतानाही राणे यांनी धोरणात्मक बाब म्हणून मोरे यांची सेवा अखंडित ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर सुधाकर पंडित यांनी याप्रकरणात जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे या प्रकरणात राणेंनाआज कोर्टात बिनशर्त लेखी माफी मागावी लागली.

close