विजयासाठी 1 विकेट बाकी

February 18, 2010 9:50 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीकोलकाता टेस्टमध्ये हशिम अमला आणि वेन पार्नेल जोडीने भारताचा विजय लांबवला. आठव्या विकेटसाठी दोघांनी सत्तर रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. आता भारताला जिंकण्यासाठी एकच विकेट बाकी आहे. 22 रन्सवर खेळणार्‍या पारनेलला ईशांत शर्मानं आऊट करत दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का दिला… हशिम अमलाने या सीरिजमधली आपली तिसरी सेंच्युरी करत भारतीय बॉलर्सच्या तोंडचं पाणी पळवले. आजच्या पहिल्या दोन सेशन्समध्ये मात्र भारतीय स्पीनर्सनी अप्रतिम कामगिरी केली. हरभजन आणि मिश्रा यांनी आफ्रिकेची मिडल ऑर्डर झटपट गुंडाळली. हरभजनने चार विकेट घेतल्यात. तर मिश्राने तीन विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. प्रिन्स, व्हिलिअर्स, ड्युमिनी आणि स्टेन हे आफ्रिकन बॅट्समन आज झटपट आऊट झाले.

close