मोबाईलला हात लावला म्हणून विकृत साधूनं केली 10 वर्षांच्या मुलाची हत्या

December 20, 2015 3:44 PM0 commentsViews:

crime

20 डिसेंबर : आपल्या मोबाइलला हात लावल्याचा राग आल्याने एका भामट्या साधुने कुर्‍हाड मारून 10 वर्षांच्या मुलाचा खून केला. या घटनेमुळे संतप्त जमावाने त्या साधुला बेदम चोप दिला. त्यात तो जागीच ठार झाला. ही खळबळजनक घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील दहेगाव शिवारात काल (शनिवारी) घडली.

महेश अरुण उगले (10) असं मुलाचं तर, महाराज विश्वानंद शरद सरस्वती (40) असं महाराजाचं नाव आहे. वैजापूर तालुक्यातील राहणार्‍या महेशच्या आजोबांनीच महाराजांना उत्तर पदेश मधून गावत आणलं होतं. एवढचं नाही तर त्याच्यासाठी झोपडी बांधून दिली होती. काही दिवसांपूर्वी महाराजांच्या मोबाईल मधील मेमरी कार्ड हरवल होतं. शनिवारी दुपारी उगले यांचा नातू महेश हा खेळत खेळत महाराजाच्या झोपडीत गेला. महेश तेथील मोबाइल उचलून पाहत असताना महाराज तिथे आला. महाराजांना ते मेमरी कार्ड मुलांनीच गायब केल्याचा संशय होता. महेशच्या हातात मोबाइल पाहताच त्याचा संताप अनावर झाला. त्याने तिथे पडलेली कुर्‍हाड उचलून महेशच्या डोक्यात मारली. त्यात महेशचा जागीच मृत्यु झाला.

महेशच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील अरुण यांच्यासह नागरिक जमा झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महेशचा मृतदेह पाहून सर्व स्तब्ध झाले. महाराजाने याबाबत उडवाउडवीचे उत्तर दिल्याने नागरिकांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी त्याला बेदम चोपले. त्यात महाराजाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. मात्र मुलाचे नातेवाईक याबाबत काहीही सांगण्यास तयार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close