सांगलीत डॉक्टर दाम्पत्याची हत्या

December 20, 2015 4:31 PM0 commentsViews:

ÜÖ¦üŸÖ¯ÖÖêäÖÆüß ÃÖÆüßËÖß

20 डिसेंबर : सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याच्या निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डॉ प्रकाश कुलकर्णी आणि अरुणा कुलकर्णी यांची धारधार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

कुलकर्णी यांच्या घरी आज (रविवारी) सकाळी मोलकरीण काम करण्यास गेली होती. त्यावेळी कोणीच दरवाजा उघडत नसल्याने त्यांना फोनही केले. मात्र, समोरून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने मोलकरणीने शेजार्‍यांची मदत घेतली. त्यावेळी प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुमध्ये तर पत्नी अरुणा कुलकर्णी यांचा मृतदेह किचनमध्ये आढळून आला.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या हत्येबाबतचा तपास सुरू करण्यात आला आहे. हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. कुलकर्णी दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी असून, मुलगा बेळगावात तर मुलगी मुंबईत राहत असल्याचे कळते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close