स्पेनची मिरिया लालागूना रोयो बनली ‘मिस वर्ल्ड’

December 20, 2015 5:32 PM0 commentsViews:

 

Newly crowned Miss World Mireia Lalaguna Royo from Spain, celebrates at the end of the 2015 Miss World Grand Final in Sanya in south China's Hainan province Saturday Dec. 19, 2015.  Spain's Mireia Lalaguna Royo was named the winner of the Miss World 2015 competition Saturday night in the southern Chinese island resort of Sanya, an event dogged by controversy over China's refusal to allow Canada's entrant to attend. (Chinatopix Via AP) CHINA OUT

मिस स्पेन मिरिया लालागुना रोयो ही मिस वर्ल्ड 2015 ठरली आहे. या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये मिस रशिया दुसर्‍या तर तिसर्‍या क्रमांकावर मिस इंडोनिशिया आहे. दक्षिण चीनमधील हैनान प्रांतात शनिवारी रात्री ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जगभरातल्या 114 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी 23 वर्षांची रोयो स्पेन इथल्या बार्सिलोनाची रहिवाशी आहे. मिस वर्ल्ड 2015च्या टॉप 5 फाइनलिस्टमध्ये स्पेन, रशिया, इंडोनेशिया, लेबनान आणि जमैकाने जागा बनवली. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व आदिती आर्या करत होती. पण तिला टॉप 10मध्येही जागा मिळवता आली नाहीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close