राजा रवी वर्मांची चित्रे गहाळ

February 18, 2010 10:03 AM0 commentsViews: 180

18 फेब्रुवारीमहान चित्रकार राजा रवी वर्मा यांनी स्वत: काढलेली 12 मौल्यवान चित्रे केरळच्या आर्ट गॅलरीमधून हरवली आहेत.20 कोटींची चित्रेअत्यंत मौल्यवान अशा या चित्रांची किंमत सुमारे 20 कोटी आहे. या चित्रांनी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड किंमत मिळवलेली आहे. त्यामुळे राजा रवी वर्मा यांच्या वारसांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने याविषयी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. 12 चित्रे गायबरवी वर्मा यांच्या वारसांनी 1940 मध्ये 75 चित्रे श्री चित्र आर्ट गॅलरीला दिलेली होती. त्यानंतर ही आर्ट गॅलरी केरळ सरकारने आपल्या ताब्यात घेतली. सध्या गॅलरीत 53 चित्रे आहेत. गॅलरीच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार 10 चित्रे गॅलरीच्या स्टोअर रूममध्ये आहेत. पण उरलेल्या 12 चित्रांबद्दल त्यांनी काहीही सांगायला नकार दिला आहे. 1970 सालापासून या 12 चित्रांचे रेकॉर्डच नाही. जबाबदारी कोणाची?1972 मधील सरकारच्या आदेशानुसार राजा रवी वर्मा यांची सगळी चित्रे ही राष्ट्रीय संपत्ती आहेत. पण या घटनेनंतर याची कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही.

close