मॅचवर हल्ल्याची शक्यता

February 18, 2010 10:08 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीभारत दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिजनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 3 मॅचची वन डे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या वन डे सीरिजची पहिली वन डे 21 फेब्रुवारीला जयपूरमध्ये खेळवली जाणार आहे. पण गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार या वन डेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे या वन डे साठी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर ही वन डे खेळवली जाणार आहे. या धोक्यामुळे जयपूरच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

close