खंडणीखोर मनसे नेत्यांची हकालपट्टी

February 18, 2010 10:18 AM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारीखंडणी वसूल करणार्‍या सांगली जिल्ह्यातील मनसेच्या दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खंडणीच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात झाली आहे. अटक झालेला महेश गव्हाणे मनसेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे, तर दिगंबर जाधव मनसेचे मीरज तालुका अध्यक्ष आहे. या दोघांना 80 हजारांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. शहरातील वादग्रस्त नगरसेवक सुनील यादवकडून हे दोघेजण 1 लाख रुपयांची खंडणी मागत होते. यादवला मोटार चोरीप्रकरणी गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. 1 लाख रुपये दिले तर पोलिसांना सांगून ही कारवाई टाळू शकतो, असे या दोघांनी सांगितले होते. खंडणी वसूल करतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली.

close