ISL 2 ची चेन्नईयिन चॅम्पियन, गोव्याला पराभवाला धक्का

December 21, 2015 8:22 AM0 commentsViews:

isl chennian21 डिसेंबर : इंडियन सुपर लीगच्या दुसर्‍या सिझनचं विजेतेपदावर चेन्नईयिन एफसीने नाव कोरलंय. अतिशय चुरशीच्या फायनलमध्ये चेन्नईयिनने गोव्याचा 3-2 ने पराभव केलाय. गोव्यातल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेली ही मॅच चुरशीची होती. पण सामन्यातल्या महत्त्वाच्या क्षणी चेन्नईने आपला खेळ उंचावला.

फायनलच्या या अटीतटीच्या मॅचमध्ये बॉलवर चेन्नईयिनचा जास्त वेळ ताबा होता. पण गोव्यानेही तुफान खेळ केला. मॅचच्या पहिल्या हाफमध्ये कोणालाही गोल करता आला नाही पण दुसर्‍या हाफमध्ये 54 व्या मिनिटांला चेन्नईयिनने आघाडी घेतली. होम क्राऊडचा फायदा गोव्याला होत होता. त्या जोरावर त्यांनी 58 व्या मिनिटांला बरोबरी साधली. नंतर 87 व्या मिनिटांला म्हणजे मॅच संपण्याच्या थोडाच वेळ आधी गोव्याने आणखी एक गोल लगावत 2-1 असी आघाडी घेतली आणि विजेतेपद जवळपास मिळवलंच होतं.

पण 90 व्या मिनिटांला गोव्याच्या खेळाडूने ऑन गोल करत चेन्नईयिनला आयतीच बरोबरी साधून दिली. या अनपेक्षित संधीचा फायदा घेत चेन्नईयिनने आणखी एक गोल 90 व्या मिनिटांला चढवत आयएसएलच्या कपवर आपलं नाव कोरलं. संपूर्ण सिझनवर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्‍या गोव्याच्या टीमला, फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close