निर्भया प्रकरण : अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

December 21, 2015 8:58 AM0 commentsViews:

juvenile Released21 डिसेंबर : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार रविवारी सुटला. यावर आज (सोमवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

या अल्पवयीन आरोपीला सोडलं जाऊ नये, अशी मागणी समाजाच्या अनेक स्तरातून होत आहे. पण अडचण अशी आहे की कायद्यानुसार अल्पवयीन दोषींना तीन वर्षांच्या वर सुधारगृहात ठेवता येत नाही. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

दरम्यान, काल रविवारी इंडिया गेटजवळ शेकडो नागरिकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली होती या आंदोलनात निर्भयाचे पालकही सहभागी झाले होते. आज दुपारी 2 वाजता पुन्हा निर्भयाचे पालक जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत.

पालकांची मागणी काय?
– जुव्हेनाईल जस्टीस कायद्यामध्ये बदल करा
– गंभीर गुन्हे करणार्‍या अल्पवयीन आरोपींना कायद्यात प्रौढाचा दर्जा द्या
– निर्भयाच्या अल्पवयीन आरोपीला सोडू नका

वास्तव काय आहे?
– कायद्यात बदल जरी केला असता तरी तो या दोषीला लागू होऊ शकत नाही
– कोणताही नवा कायदा पूर्वलक्षी प्रभावानं लागू होत नाही
– निर्भयाच्या अल्पवयीन दोषीला आता सुधारगृहात ठेवता येणार नाही

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close