पार्टी आॅल नाईट, नाताळ आणि थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार

December 21, 2015 9:41 AM0 commentsViews:

31st party21 डिसेंबर : मुंबईत नाताळ आणि 31 डिसेंबरची पार्टी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी… मुंबईतील बार आणि हॉटेल्स 24 आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. अट फक्त एकच आहे बारमधील पाटर्‌यांमध्ये कोणती दारू दिली जाणार, याची माहिती संबंधितांनी उत्पादन शुल्क विभागाला देणं बंधनकारक आहे. दुसर्‍या दिवशी या विभागाचे अधिकारी ऑडिट करणार आहेत. अशा प्रकारची योजना या विभागाच्या वतीने प्रथमच राबवली जातेय.

तर तळीराम वाहनचालकांवर 31 डिसेंबरला कारवाई करण्यासाठी शहरात शंभर ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक पोलीस तपासणी करणार आहेत. 24 आणि 31 डिसेंबरला पहाटेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवण्यावरुन दरवर्षी वाद निर्माण होतात. बार असोसिएशन न्यायालयात जातं. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना परवानगी मिळते. परंतु या वेळी उत्पादन शुल्क विभागानेच दोन दिवस बार आणि हॉटेल्स पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close