‘मिस’टेक युनिव्हर्स, चुकून दुसरीला दिला मुकूट !

December 21, 2015 1:22 PM0 commentsViews:

21 डिसेंबर : कोण होणार मिस युनिव्हर्स 2015 या घोषणेकडे अवघ्या जगाचे लक्ष…आणि अखेर त्या नावाची घोषणा होते…टाळ्यांचा कडकडाट होतो…नव्याने झालेली मिस युनिव्हर्स मोठ्या आनंदाने हात उंचावून सर्वांना अभिवादन करते…रत्नजडीत मुकूटही मिस युनिव्हर्सला घातला जातो…पण दुसर्‍याच क्षणी त्या स्पर्धकाला तुम्ही मिस युनिव्हर्स नाहीत असं सांगितलं जातं…गोंधळलात ना तुम्ही पण हो, हे खरंच घडलं.

लासवेगासमध्ये पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची घोषणा करतांना सूत्रसंचालकानं पहिल्यांदा मिस युनिव्हर्स म्हणून कोलंबियाच्या अरिंदाना अरेव्ह्यालोची पहिल्यांदा घोषणा करण्यात आली. त्यानंतर तिला क्राऊनही प्रदान करण्यात आला. पण त्यानंतर सुत्रसंचालकाने आपल्याकडून चूक झाली, आपण चुकीचं नाव घोषित केलं. माफी मागत सूत्रसंचालकान फिलिपिन्सची पिया अलेन्झो विजेती असल्याची घोषणा केली. त्यानंतर कोलंबियाच्या अरिंडाच्या डोक्यावरुन क्राऊन काढून तो अलेन्झोला प्रदान करण्यात आला. झाल्या प्रकाराबाबत सूत्रसंचालक हार्वेनी ट्विटरवरुन सगळ्यांची माफीही मागितली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close