पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू

February 18, 2010 10:50 AM0 commentsViews: 5

18 फेब्रुवारी पुण्यातील लोकमान्यनगर भागातील एका कचराकुंडीत आज बॉम्बसदृश वस्तू सापडली.या वस्तूशी लहान मुले खेळत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर ताबडतोब बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉडला बोलावण्यात आले. परिसरातील वाहतूकही थांबवण्यात आली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बॉम्ब स्क्वॉडचे जवान आता या वस्तूची तपासणी करत आहेत. वाहतूकही पूर्ववत सुरू झाली आहे. कोणालाही संशयित वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

close