मुख्यमंत्र्यांना हायकोर्टाची नोटीस

February 18, 2010 11:36 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं नोटीस बजावली आहे. माजी आमदार माधवराव किन्हाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी इलेक्टॉनिक मतदान मशीनमध्ये बिघाड केल्याचा तसेच निवडणूक खर्च कमी दाखवल्याचा आरोप याचिकेत केला होता. याप्रकरणी कोर्टानं मुख्यमंत्र्यांना आठ आठवड्यांच्या आत उत्तर द्यायला सांगितले आहे.

close