येत्या मे महिन्यात निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी

December 21, 2015 4:15 PM0 commentsViews:

MHADA121

21 डिसेंबर : म्हाडाची घरं घेणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी येत्या मे महिन्यात निघणार आहेत. या लॉटरीमध्ये मुंबईतील सुमारे 1 हजार 84 घरांचा समावेश असल्याची शक्यता असून, पुढील महिन्यात या लॉटरीची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळासह कोकण मंडळाच्या 4 हजार घरांचीही लॉटरी मे महिन्यात काढण्याचा विचार सुरू आहे. दोन्ही लॉटरी एकत्रित काढल्यास या लॉटरीत मुंबईकरांसाठी 5 हजार घरे उपलब्ध होतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे. प्रतीक्षानगर, मालाड आदी ठिकाणच्या घरांचा यामध्ये समावेश असेल. मंडळामार्फत घरांची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर पुढील महिन्यात अधिकृतरीत्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार येईल, असं म्हाडा अधिकार्‍यानं सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close