बहादूर प्रवाशाने वाचविला चिमुरड्याचा जीव, थरारक दृश्य कॅमेर्‍यात कैद

December 21, 2015 5:34 PM0 commentsViews:

21 डिसेंबर : संध्याकाळी चारची वेळी… अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सर्वत्र गर्दी… सर्व प्रवाशी परतीच्या मार्गावर निघालेले. या गर्दीत आपल्या आईचा शोध घेणारा चिमुरडा चक्का मृत्यूच्या दारेत जाऊन उभा राहतो. मात्र, डोळ्याची पापणी पडते न पडते एका बहादूर प्रवाशी जिवाची पर्वा न करता त्याला मृत्यूच्या दारेतून खेचून काढतो. ही सगळी थरारक दृष्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत.

AMBARNATH!#

ही थरारक घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकावर काल (रविवारी) दुपारी 4च्या सुमारस घडली. कुर्ल्याला राहणारा हा मुलगा त्याच्या आईसोबत अंबरनाथला त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. प्लॅटफॉर्मवर या मुलाची त्याच्या आईसोबत चुकामुक झाली. तेवध्यात चिमुरड्याची आई प्लॅटफोर्म क्रमांक दोन क्रॉस करून प्लॅटफोर्म क्रमांक तीनवर गेली होती. मात्र हा मुलगा प्लॅटफोर्म क्रमांक 2 वरच आपल्या आईला शोधात होता.

आपल्या आई प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर असल्याचे समजताच तो प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जात होता. मात्र फलाटाची उंची जास्त असल्याने तो रेल्वे रुळातच अडकला याच वेळेस कर्जतहून सीएसटीला जाणारी लोकल या रुळावरुन वेगाने येत होती. हा चिमुरडा समोरून येणार्‍या लोकलच्या खाली सापडेल आहे, हे पाहताच त्या ठिकाणी असलेल्या एका बहादूर प्रवाशाने आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला वाचवले. हे सगळे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. ही सगळी थरारक दृष्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. मात्र हा चिमुरडा आणि त्याचे प्राण वाचवणारा हा बहादूर कोण होता याची मात्र अजून मिळू शकली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close