दिमाखदार विजय

February 18, 2010 11:40 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीभारतीय टीमने अखेर कोलकाता टेस्ट दिमाखात जिंकली. आणि त्याचबरोबर टेस्ट क्रमवारीतलं अव्वल स्थानही कायम ठेवले आहे.दक्षिण आफ्रिकन टीमचा त्यांनी एक इनिंग आणि 63 रन्सनी पराभव केला. आज पाचव्या दिवसाचे हीरो ठरले ते हरभजन सिंग आणि अमित मिश्रा.पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा आफ्रिकन टीम 232 रन्सनी मागे होती. आणि त्यांच्या सात विकेट हातात होत्या. त्यामुळे आज अमला आणि प्रिन्स यांनी धोरण ठेवले ते सावधपणे बॅटिंग करण्याचे. पण लंचच्या थोडाच वेळ आधी हरभजनने प्रिन्सला आऊट करत टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर मग मिश्राने डिव्हिलिअर्सलाही झटपट आऊट केले. आणि भारतीय टीमला विजयाची चाहूल लागली. लंचनंतर ड्युमिनी आणि स्टेनही आऊट झाले.

close