पाणी वाया घालवणार्‍यांवर कारवाई

February 18, 2010 11:53 AM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारीपाण्याचा अपव्यय करणार्‍यांविरोधात नवी मुंबई पालिकेच्या भरारी पथकांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या पथकाने 15 दिवसांत 650 जणांवर कारवाई केली आहे.नवी मुंबई महापालिकेने पाणीदर कमी करुन एकीकडे नवी मुंबईकरांना दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे ही कारवाई सुरू केली आहे.महिन्याकाठी फक्त 50 रुपये पाणी बिल भरणार्‍या नवी मुंबईकरांनी आता सावध राहणे गरजेचे ठरणार आहे. वाहने, रस्ते आणि बगिच्यांसाठी पाण्याचा मनसोक्त वापर करणार्‍यांवर महापालिका कारवाई करणार आहे. नवी मुंबई महापालिकेने पाण्याचा अपव्याय करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी 5 भरारी पथके तयार केली आहेत. ही पथके गल्लो-गल्ली फिरून पाण्याचा अपव्यय होत असेल तर नागरीकांना नोटीस बजावतात. आणि त्यांचे पाण्याचं कनेक्शनही तोडण्यात येते.

close