संजय दत्त 25 फेब्रुवारीला जेलबाहेर ?

December 22, 2015 9:06 AM0 commentsViews:

sanjay dutt3422 डिसेंबर : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवाडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त 25 फेब्रुवारी रोजी जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संजयची शिक्षा संपणार आहे. पण चांगल्या वर्तणुकीच्या आधारे त्याच्या फेब्रुरीमध्येच सुटका होण्याची शक्यता आहे.

संजय दत्त 14 दिवसांसाठी फर्लोच्या रजेवर होता. त्यावेळी तो मुदतीच्या दोन दिवसांनंतर येरवडा जेलमध्ये परतला. पण ही चूक जाणूनबुजून झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. गृहमंत्रालायनं संजय दत्तची ही चूक माफ केली तर तो शिक्षा संपण्यापूर्वीच म्हणजे 25 फेब्रुवारीला जेलबाहेर येऊ शकतो, असं समजतंय. ऑक्टोबर 2016 मध्ये संजय दत्तची पाच वर्षांची शिक्षा संपते. पण चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे शिक्षेत सूट मिळण्याची जेल कायद्यानुसार तरतूद आहे. त्याचा फायदा संजय दत्तला मिळू शकतो. जेलमध्ये असताना किंवा पॅरोल आणि फर्लोच्या रजेवर असताना संजय दत्तनं कोणताही गुन्हा किंवा गैरप्रकार केलेला नाही. ही त्याची जमेची बाजू ठरू शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close