दिघा अनधिकृत इमारत प्रकरणी आतापर्यंत 28 गुन्हे दाखल

December 22, 2015 8:38 AM0 commentsViews:

digha_ncp22 डिसेंबर : नवी मुंबईतील दिघा अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात आतापर्यंत 28 गुन्हे दाखल झाले आहे. तर 15 जणांना अटक करण्यात आलीये. पण ही कारवाई बिल्डर आणि एजंटवर करण्यात आलीय.

या अनधिकृत इमारतींना अभय देणार्‍या अधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरलीय. तर या संबंधित अधिकार्यावरील कारवाईबाबत कोणतेच निर्देश मिळाले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणजे जर या इमारती अनधिकृत आहेत, तर तुम्ही 50 वर्षं काय करत होतात, तेव्हाच आम्हाला का नाही सांगितलंत, असा संतप्त सवाल इथल्या महिला करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close