दिल्लीत बीएसएफचं विमान कोसळलं, 10 ठार

December 22, 2015 1:55 PM0 commentsViews:

bsf plen crash22 डिसेंबर : दिल्लीच्या द्वारका सेक्टर 8 भागात बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचं चार्टर्ड विमान कोसळलं, या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विमानात 8 अभियंते आणि 2 पायलट होते.

बीएसएफचं बी 200 हे विमान बीएसएफच्या अभियंत्यांना घेऊन नवी दिल्लीहून रांचीला जात होतं. सकाळी दहा वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर द्वारकेतल्या सेक्टर 8 मधल्या रेल्वे क्रासिंगजवळ विमान कोसळलं. विमान कोसळताच विमानानं पेट घेतला. विमानतळाजवळच्या एका मलनिःसरण केंद्राच्या आवारात हे विमान कोसळलं. जर हे विमान निवासी भागात कोसललं असतं, तर जीवितहानी जास्त झाली असती. यासाठीच पायलटनं हे विमान या केंद्राजवळ नेलं, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची बातमी कळताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे घटनास्थळी गेले. या विमानात बीएसएफचे जवान आणि काही तंत्रज्ञ होते. रांचीला एका हेलिकॉप्टरच्या दुरुस्तीसाठी हे तांत्रिक निघाले होते, असं कळतंय.

कसा झाला अपघात
– दिल्ली विमानतळावरून सकाळी 9:45 वाजता उड्डाण
– थोड्याच वेळात विमानात तांत्रिक बिघाड
– पायलटनं एटीसीशी संपर्क साधला, परत लँड करण्याचे आदेश
– विमान परत फिरवलं, पण तोपर्यंत एटीसीशी संपर्क तुटला
– विमानतळाजवळच्या मलनिःसरण केंद्रावर कोसळलं
– निवासी भागात विमान कोसळू नये याचा प्रयत्न पायलटनं केल्याची शक्यता

कसं असतं हे विमान?

– अमेरिकेच्या बीचक्राफ्ट कंपनीचं B200 विमान
– आसन क्षमता : 13 प्रवासी
– किंमत : 35 ते 50 कोटी रु.
– लांबी 43 फूट
– कमाल वेग : 545 किमी प्रति तास
– जगात अशी 3500 हजार विमानं आहेत
– अमेरिकन लष्कर आणि हवाई दलाकडेही हीच विमानं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close