याहूच्या यादीत गोमाता ठरली ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’

December 22, 2015 12:36 PM0 commentsViews:

COW4354322 डिसेंबर : याहूने त्यांच्या वर्षभरातील सर्वेक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. ही यादी मुळातच युझर्सच्या वर्षभराच्या सर्चवरुनच जाहीर केली जात असून 2015 हे या सर्वेक्षणाचे आठवे वर्ष आहे.

या सर्व्हेक्षणातील आश्चर्याची बाब म्हणजे, त्यातील भारताच्या यादीत आपली गोमाता ठरली ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’. सर्वच फेमस आणि बड्या पर्सनॅलिटींना मागे टाकत गोमातेने यंदा याहूच्या या पर्सनॅलिटी सर्च स्पर्धेत बाजी मारली आहे.

गोहत्या प्रकरण असो वा महाराष्ट्र सरकारने गोमांस विक्रीवर आणलेली बंदी असो, सर्वच कारणांमुळे वर्षभरात गाय ही मोठ्‌या चर्चेचा विषय तर ठरलीच पण त्याहून जास्त ऑनलाईन सर्चिंगचाही विषय ठरली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close