निर्मल पांडे यांचे निधन

February 18, 2010 12:44 PM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी प्रसिद्ध अभिनेता निर्मल पांडे यांचे आज मुंबईत हार्टअटॅकमुळे निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. अंधेरी येथील होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. निर्मल पांडे यांनी बँडीट क्विन, गॉडमदर, दायरा, उलाढाल या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. नाटकांमधून आपली कारकिर्द सुरू केलेल्या निर्मल पांडेंची कारकिर्द सिनेमांतून बहरली. दायरा सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मराठी सिनेमा उलाढालमध्ये त्यांनी काम केले होते. अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये त्यांच्या भूमिकांची विशेष दखल घेतली गेली आहे.

close