औरंगाबादमध्ये बसेस बंद

February 18, 2010 12:54 PM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी पगार वेळेवर मिळत नसल्याने औरंगाबाद महानगरपालिकेच्या बस कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांनी सर्व बसेस जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभ्या केल्या आहेत. या आंदोलनामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर वाहन मिळत नाही. तसेच ऑफिसमधून घरी परतणार्‍या लोकांचाही खोळंबा झाला आहे.पगार तसेच इतर सुविधांच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी हा बंद पुकारला आहे.

close