भुजबळांना दणका, ईडीकडून 110 कोटींच्या मालमत्तेवर टाच

December 22, 2015 4:10 PM0 commentsViews:

Bhujbal2311

22 डिसेंबर : महाराष्ट्र सदन आणि मुंबईतील कलिना भूखंड घोटाळ्याप्रकरणी राज्याचे तत्कालीन सार्वजनिक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, अंमलबजावणी संचालयाने आज (बुधवारी) त्यांच्या मुंबईतील दोन मालमत्तांवर छापा टाकून जप्तीची कारवाई केली.

सांताक्रूझ पश्चिमेला असलेली सॉलिटियर ला पेटिट ही 9 मजली इमारत सील केली आहे. ही मालमत्ता भुजबळ कुटुंबियांच्या मालकीची आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये ईडीने भुजबळांशी संबंधित कंपनी परवेश कंस्ट्रक्शन कंपनीची 160 कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

गेल्या शुक्रवारपासून ईडीकडून ही कारवाई सुरू होती. या छाप्यात या दोन्ही मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली. या मालमत्तांची बाजारभावाप्रमाणे किंमत 110 कोटी रूपये आहे. या कारवाईमुळे भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाप्रकरणी ईडीने यापूवच्ही भुजबळांच्य मालमत्तेवर छापा टाकला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close