तेलंगणात माथेफिरूच्या तलवार हल्ल्यात 22 जणं जखमी

December 22, 2015 4:25 PM0 commentsViews:

Telangana21`

22 डिसेंबर : तेलंगणामधल्या करीमनगर इथे एका माथेफिरूने लोकांवर तलवारीने वार केल्याची घटना आज (मंगळवारी) घडली आहे. यामध्ये करून पोलिसांसह 22 जणांना जखमी झाले. अखेर त्या माथेफिरूला अडवण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या माथेफिरूचं वय 28 वर्षं इतकं होतं. त्यानं स्वत:च्या आई-वडिलांसह एकूण 22 जणांवर हल्ला केला, त्यापैकी 6 जण गंभीर जखमी आहेत, तर इतरांना किरकोळ जखमा झाल्या. हल्ल्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी त्याला हातातली तलवार खाली ठेवायला सांगितली, पण त्यानं त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात उपचारांदरम्यान हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

बलविंदर सिंग असं या माथेफिरूचं नाव आहे. तो व्यवसायानं इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर आहे. त्यानं लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती, मात्र त्यात त्याला अपयश आलं होतं. त्यामुळे तो गेल्या महिन्याभरापासून निराश झाला होता, नैराश्याच्या झटक्यातच त्यानं हे हल्ले केले असल्याचं सांगण्यात येतं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close