पुण्यात आपटे रस्त्यावर पोलिसावर गोळीबार

December 22, 2015 9:53 PM0 commentsViews:

crime

22 डिसेंबर : पुण्यातील आपटे रस्त्यावर एका संशयित व्यक्तीने पोलीस शिपायावर गोळीबार केल्याची घटना आज (मंगळवारी) संध्याकाळी घडली. यामध्ये संबंधित पोलीस शिपाई बचावला असून, हल्लेखोराचा शोध घेण्यात येतो आहे.

मयूर भोकरे आणि संदेश खडके हे दोन पोलीस कर्मचारी शिवाजी नगरमधल्या सावरकर भवनाजवळ गस्ती वर असताना त्यांना एका गुन्हेगाराचा सुगावा लागला. हा गुन्हेगार बाईकवर होता आणि त्याच्याजवळ देशी बनावटीची रिव्हॉल्वर होती. त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचेया व्यक्तीला लक्षात आल्यावर त्याने आपटे रस्त्यावर पोलिसाच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी भोकरे यांच्या बुटाला चाटून गेली. यानंतर ती व्यक्ती घटनास्थळावरून दुचाकीवरून पळून गेली. गोळीबार करून हे गुन्हेगार फरार झाले आहेत. भोकरे यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर दुचाकीस्वाराच्या गाडीचा क्रमांक नोट करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close