दिघ्यातल्या अनधिकृत बांधकामांना 31 डिसेंबरपर्यंत दिलासा

December 22, 2015 11:05 PM0 commentsViews:

digha_ncp

22 डिसेंबर : नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खुद्द सभापतींनी हस्तक्षेप करुन 31 डिसेंबरपर्यंत ही घरे पाडु नये असे निर्देश विधानपरीषदचे उपसभापती वसंत डावखरेंना दिलेत. तसंच 31 डिसेंबरपर्यंत सरकारने आपली बाजू हायकोर्टात मांडावी, अशी सुचनाही केलीये.

विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न हा फक्त दिघापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. सर्वांनी एकत्र येवून हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, असं सांगत सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी आणि न्यायालयात भूमिका मांडावी. तोपर्यंत ही कारवाई स्थगित ठेवावी, असा आदेश डावखरे यांनी दिला. दिघ्यातले नागरिक गेल्या 5 पिढ्यांपासून राहत आहे. पण रहिवाशांना 31 डिसेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दिघ्यातील रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारवाई करु नका, अशी मागणी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close