भाजपला दलित प्रेमाचे भरते

February 18, 2010 3:56 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी इंदूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एका दलित कुटुंबात जेवण केले. त्यामुळे आगामी काळात दलित व्होट बँक ओढण्याचा भाजपचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.मायावती आणि राहुलशी स्पर्धाभापजला त्यांची व्होट बँक सध्या 8 ते 10 टक्क्यांनी वाढवायची आहे. आणि हे दलितांच्या मदतीनेच साध्य करता येईल याची पक्षाला जाणीव झाली आहे. पण ही दलित व्होट बँक मोठ्या संख्येने मायावतींच्या पाठीशी आहे. त्यातच राहुल गांधींनी त्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भाजपच्या या प्रयत्नांना जरा उशीरच झाला असे सध्याचे चित्र आहे.राहुल यांच्या अजेंड्यात युवा, मुस्लिम आणि दलितांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरात लवकर डॅमेज कंट्रोल करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न यातच दलित नेते बंगारु लक्ष्मण आणि सवर्ण नेते दिलीपसिंह जुदेव कॅमेर्‍यासमोर पैसे घेण्याचे प्रकरण अजनही लोकांच्या आठवणीतून गेलेले नाही. त्यामुळे गडकरींच्या नेतृत्त्वाखाली भाजप आता आपली प्रतिमा कशी सावरतोय, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

close