जेटलींच्या घराबाहेर आप कार्यकर्त्यांची निदर्शनं

December 23, 2015 2:00 PM0 commentsViews:

APP protest13

23 डिसेंबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निवासस्थानावर धडक दिली. जेटलींच्या राजीनाम्याची मागणी करत आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.

अरूण जेटली हे दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असताना त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसंच मोदी सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याची जळजळीत टीकाही जेटली यांच्यावर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जेटलींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

त्यामुळे संतप्त झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी तुघलक रोडवरील जेटलींच्या घराबाहेर आज जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसंच पाण्याच्या वापर केला. सध्या या परिसरतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close