दिल्लीत कोर्टाच्या आवारात गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू

December 23, 2015 2:13 PM0 commentsViews:

†ÖŸÖ¯ÖÝÖ ‡ÝÖßÖ421

23 डिसेंबर : दिल्लीच्या कडकडदुमा कोर्टाच्या आवारात आज (बुधवारी) सकाळी गोळीबाराची घटना घडली. त्यात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कडकडदुमा कोर्टाच्या आवारात अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. त्यात बंदोबदस्तावरील पोलीस कॉन्स्टेबलसह दोनजण जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान जखमी पोलिसाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघा जणांवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबार प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, दोन टोळयांतील वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close