‘अप्सरा’ने कमावले 7 कोटी

February 18, 2010 5:04 PM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी नटरंगमधली अप्सरा लोकांना चांगलीच भावली आहे. नटरंग सिनेमाने त्यातल्या गाण्यांच्या जोरावर आतापर्यंत 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'नटरंग'च्या रिलीजला उद्या 50 दिवस पूर्ण होत आहेत.राज्यभरात 90 थिएटर्समध्ये हा सिनेमा सध्या सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात नटरंग यशस्वी झाला आहे. नटरंगची गाणीही लोकप्रिय झालीत. मुंबईतल्या तीन मल्टिप्लेक्समध्ये नटरंग इंग्रजी सब-टायटल्ससह नुकताच रिलीज झाला आहे.

close