अधिवेशनात सावळा गोंधळ, चक्क राष्ट्रगीत न घेता सभागृह स्थगित

December 23, 2015 4:27 PM0 commentsViews:

nagpur vidhan bhavan23 डिसेंबर : नागपूरचं हिवाळी अधिवेशनाचं सूप अखेर आज वाजलं. गेल्या काही दिवसांपासून गदारोळात सुरू असलेल्या अधिवेशनाचा शेवटही आज कडूच झाला. चक्क राष्ट्रगीत न घेता सभागृह स्थगित करण्यात आल्याची घटना घडलीये.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशात शेवटच्या दिवशीही अभूतपूर्व गोंधळ झाला. विधान परिषेदत तर चक्क राष्ट्रगीत न होताच सभागृह स्थगित करण्यात आलं. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे असं घडल्याच बघायला मिळालं. आमदारांनी ही सभापतींच्या लक्षात आणून देत मग फक्त राष्ट्रगीत घेण्यासाठी आमदारांना परत सभागृहात बोलावण्यात आलं आणि मग राष्ट्रगीत घेण्यात आले.

9 मार्चला पुढील अधिवेशन सुरू होणार आहे. परिषदेत गोंधळ झाला म्हणून मी असा निर्णय घेतल्यांचं सभापतींनी नंतर स्पष्ट केलं. विशेष म्हणजे या आधी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच तालिका सभापतींनी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब केलं. यामुळे भाजप नेत्यांनी तालिका सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी दर्शवली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close