मुंबई- गोवा हायवेवर 13 ठार

February 19, 2010 9:26 AM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारीमुंबई- गोवा हायवेवर सुकेळी खिंडीजवळ सुमो आणि ट्रकच्या अपघातात 13जण ठार झाले आहेत. हे सर्वजण मुंबईतील घाटकोपरमधले आहेत.मृतांमध्ये 3 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. जखमींना नागोठणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. MH-04 AS 534 या नंबरची सुमो जीप घाटकोपरवरुन खेडला लग्नासाठी जात होती. पहाटेच्या वेळी तिची ट्रकशी टक्कर झाली.चिमुकली वाचलीसुदैवाने या अपघातात एक 4 वर्षांची चिमुकली आश्चर्यकारकपणे वाचली आहे. रवीना कोकरे असे तिचे नाव आहे. तिचे आई, वडील,भाऊ या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. या लहान मुलीवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

close