कोल्हापुरकरांच्या लढ्याला यश, अखेर टोल रद्द

December 23, 2015 5:29 PM0 commentsViews:

pune toll 34523423 डिसेंबर : गेल्या कित्येक वर्षांपासून टोलसाठी लढा देणारे कोल्हापूरकर अखेर जिंकले आहे. शहरामधील 9 टोल रद्द व्हावे यासाठी नागरिकांनी दीर्घकाळ दिलेल्या लढ्याला आज यश आलं, कोल्हापूरमधला टोल रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंबंधी त्यांनी पत्रकार परिषदेतही निवेदन केलं.

आयआरबी या कंपनीकडे कोल्हापुरातल्या रस्त्याचं आणि टोल गोळा करण्याचं कंत्राट होतं. या कंपनीच्या टोलनाक्यांवर अनेक आंदोलनं झाली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळही झाली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यानही टोलचा मुद्दा कळीचा ठरला होता. टोल रद्द करण्याचं आश्वासन देऊन भाजपनं ही निवडणूक लढवली होती. त्याचा कोल्हापुरात पक्षाला फायदाही झाला होता. त्यामुळे टोल रद्द करण्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती करत टोल बंद करण्याची घोषणा केलीये.

अखेर टोलधाड रद्द

जानेवारी 2009 – रस्ते विकास प्रकल्पाला सुरुवात
18 डिसेंबर 2011 रोजी टोलविरोधी कृती समितीची स्थापना
09 जानेवारी 2012 – टोलविरोधातला पहिला महामोर्चा
01 मे 2013 – टोलविरोधात कोल्हापूर बंद
17 ऑक्टोबर 2013 पासून पोलीस बंदोबस्तात टोलवसुलीला सुरुवात
20 ऑक्टोबर 2013 – सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या मंत्र्यांच्या घरावर मोर्चा
06 जानेवारी 2014 – कृती समितीचे बेमुदत उपोषण सुरु
12 जानेवारी 2014 – टोलनाक्यांची जाळपोळ
27 फेब्रुवारी 2014 – टोलवसुलीला उच्च न्यायालयाची स्थगिती
05 मे 2014 – सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवली
16 जून 2014 – पोलीस बंदोबस्तात टोलवसुली सुरु

रस्ते विकास प्रकल्प – 220 कोटी रुपयांचा
प्रकल्पाचा करार – कोल्हापूर मनपा, राज्य सरकार, एमएसआरडीसी, आयआरबी
49 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केला
9 टोलनाक्यांवरुन 30 वर्ष टोलवसुली होणार होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close