वाजिद इसिसच्या संपर्कात नाही, दोघांचा शोध सुरू

December 23, 2015 7:45 PM0 commentsViews:

23 डिसेंबर : मुंबईतील मालाड मालवणी भागातील 3 तरुण इसिस दहशतवादी संघटनेत सहभागी असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. हे तिन्ही तरुण बेपत्ता आहे. पण, एटीएसने तिघांपैकी वाजिद शेख याला शोधून काढलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे इसिसशी संबंध असल्याचं सध्यातरी स्पष्ट झालेलं नाही, असं पुणे एटीएसचे प्रमुख भानुप्रताप बर्गे यांनी स्पष्ट केलंय.
पुणे एटीएसनं आता वाजीदला मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. इतर दोन जणांचा शोध अजूनही सुरू आहे.

wajidपुणे एटीएसनं मंगळवारी रात्री वाजिदला पुण्यात पकडलं होतं. आज दिवसभर त्याची चौकशी केल्यावर त्याच्याकडे पासपोर्टही नसल्याचं स्पष्ट झालंय. त्याचा इसिसशी संबंध असल्याचंही समोर आलं नाही. पण तरीही सर्व शक्यतांचा आम्ही तपास करतोय, असं बर्गेंनी म्हटलंय. वाजिद इसिसच्या संपर्कात असल्याची भिती त्याच्या पालकांनी व्यक्त केली होती. त्यावरून हा तपास झाला होता. वाजिद हा लिंबू विक्रेता आहे.वाजिद सापडल्यानं त्याच्या नातेवाईक आणि कुटुंबियांना आनंद झालाय. तो इसिसच्या संपर्कात असल्याची त्याच्या कुटुंबीयांना भीती होती. पण वाजिद सापडल्यानं त्याच्या वडिलांनी एटीएसचे आभार मानले आहे.

मात्र आता मालवणीतील अयाज सुलतान हा 23 वर्षीय मुलगा काबूलला गेल्याची माहिती नुकतीच एटीएसच्या हाती लागलीये. अयाज हा मालवणीतील कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. बेपत्ता असलेल्या मोहसिन शेख, अयान सुलतान या दोघांचा शोध सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close