जेटलींवरची टीका भोवली, कीर्ती आझाद यांची भाजपातून हकालपट्टी

December 23, 2015 8:57 PM0 commentsViews:

kirti azad23 डिसेंबर : दिल्ली क्रिकेट असोसिएशन गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप करणारे भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांना चांगलंच महागात पडलं. भाजपने त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत पक्षाबाहेरचा रस्ता दाखवलाय. कीर्ती आझाद यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये.

डीसीएवरुन अरुण जेटली विरुद्ध अरविंद केजरीवाल यांच्यात युद्ध सुरू झालंय. या युद्धात उडी घेत कीर्ती आझाद यांनी पक्षालाच घरचा अहेर दिला. आझाद यांनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप केले होते. डीसीएमध्ये अनेक गैरव्यवहार झाले आहेत. ज्या कंपन्यांना कंत्राटांसाठी पैसे देण्यात आले, त्यांचे पत्ते खोटे आहेत, आणि काही कंपन्याच बोगस आहेत, त्या अस्तित्वातच नाहीत, असा आरोप आझाद यांनी केला होता. एवढंच नाहीतर मी मोदींचा फॅन आहे. माझं अरुण जेटलींशी कोणतही वैर नाही. मला फक्त भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचंय, असंही आझाद म्हणाले होते.

आज भाजपने आझाद यांना एक पत्र लिहून पक्षातून हकालपट्टी केली असं स्पष्टपणे सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही पक्षाचे नियम मोडले आणि पक्षाविरोधात कार्य केलंय. पक्षाला बदनाम करण्यासाठी तुम्ही काँग्रेस आणि आप पक्षात सामिल झाला. तुम्ही संसदेत आणि संसदेबाहेर असं कार्य केलं जे पक्षात शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार तुमचं पक्षाचं सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे असं स्पष्टपणे या पत्रात नमूद करण्यात आलंय. पक्षाच्या या कारवाईवर आझाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केजरीवाल काय आरोप करताय हा त्यांचा प्रश्न होता. पण मी आजपर्यंत पक्षासोबत एकनिष्ठ होतो. जे चुकीचं वाटलं त्याबद्दल बोलणं काय चूक होतं अशी संतप्त प्रतिक्रिया आझाद यांनी दिली. विशेष म्हणजे, मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती बैठक पार पडली होती या बैठकीला अरुण जेटली उपस्थिती होते. याच बैठकीत आझाद यांच्या हकालपट्टीचा निर्णय झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close