औरंगाबादमध्ये रॅगिंग

February 19, 2010 9:33 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारीमहाराष्ट्रात रॅगिंगविरोधी कायदे असतानाही कॉलेजमध्ये रॅगिंगचे प्रकार घडतच आहेत. औरंगाबादमध्येही आज रॅगिंगचा एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सातारा परिसरातील एमआयटी इंजीनिअरिंग कॉलेजात पहिल्या वर्षात शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाले आहे. रॅगिंग करणार्‍या 4 विद्यार्थ्यांविरोधात गुरु गोविंदसिंगपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी. टेकच्या प्रथम वर्षात शिकणारा अजिंक्य पाटील आणि त्याचा मित्र हर्षवर्धन लोमटे हॉस्टेलच्या मेसमधून जेवण झाल्यावर बाहेर पडले. 4 सीनिअर विद्यार्थ्यांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यांचे कपडे काढून पाया पडायला भाग पाडले. शिवाय कान धरुन बैठकाही मारायला लावल्या. अजिंक्यच्या डोक्यात हातातील कडे मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे त्यांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. बी. ई. फायनल वर्षात शिकणार्‍या रवींद्र सिंग, पार्थ, सौरव, अनुसुख या 4 विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close