आग विझवताना जवानाचा मृत्यू

February 19, 2010 9:59 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारीमुंबईत बोरिवली इथे गोयल शॉपिंग सेंटरला आज मोठी आग लागली. ही आग विझवताना फायर ब्रिगेडच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. प्रदीप झगडे असे मृत्यूमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे. ते बोरिवली फायर स्टेशनमध्ये असिस्टंट स्टेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होते. आग विझवताना आणखी 3 जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भगवती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. स्टेशन ऑफिसर मनोज महादेव सावंत, असिस्टंट स्टेशन ऑफिसर वसंत धोंडगेकर आणि एक फायरमन आग विझवताना जखमी झाले.फायर ब्रिगेडची 12 इंजिने ही आग विझवत होती. जखमी जवानांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर झगडे यांचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले.

close