पंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, हेलिकॉप्टरचा मुद्दा केला उपस्थित

December 24, 2015 9:02 AM0 commentsViews:

modi putin24 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौर्‍यावर आहे. बुधवारी रात्री त्यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि व्दिपक्षीय मुद्यांवर चर्चा केली.

रशिया पाकिस्तानला काही लढाऊ हेलिकॉप्टर देण्याची शक्यता आहे. त्यावर भारतानं चिंता व्यक्त केली असून तो मुद्दाही पंतप्रधान उपस्थित केलाय.

तर पुतीन यांनी पंतप्रधानांसाठी खास मेजवानीचं आयोजन केलं होतं. आज भारत-रशियाची वार्षिक शिखर परिषद होणार आहे. दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या संरक्षण करारांवर स्वाक्षर्‍या होण्याची चिन्हं आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close