मुंबईकर गारठले, मुंबापुरी महाबळेश्वरपेक्षाही थंड

December 24, 2015 9:30 AM0 commentsViews:

mumbai winter

24 डिसेंबर : मुंबई आणि हिवाळा हे गणित कधी फारसं जुळून येत नाही. पण, गेल्या कित्येक दशकात पहिल्यांदाच मुंबईत थंडीची लाट आली असून मुंबई चक्क थंडई झालीये. नेहमी घामांच्या धारांनी भिजलेले मुंबईकर कधी नव्हे ते स्वेटर, जॅकेट आणि कानटोप्यात दिसून येत आहे.

मुंबईकरांना बुधवारी मोसमातल्या सर्वात थंड दिवसाची अनुभूती आली. मुंबईतलं तापमान 11.6 सेल्सिअस अंशांपर्यंतपर्यंत घसरलं.
विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातलं या दशकातलं हे दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात कमी तापमान आहे. महाबळेश्वरचं तापमान 14 अंशावर आहे त्यापेक्षा मुंबईचे तापमान हे 3 ने कमी आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात थंडी अधिक वाढण्याचा अनुभव असल्याने यानंतरच्या काळातही पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 23 डिसेंबर या दिवसाची नोंद उत्तर कोकणातील शीत दिवस म्हणून हवामान खात्याने नोंद केलाय.

तर राज्यात सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये सलग सलग दुसर्‍या दिवशीही 6 अंश तापमानाची नोंद झाली. डहाणूमध्ये 16.6 अंश
सेंल्सिअस तर पुण्यात 9.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यात थंडी अनुभवण्यासाठी तरुणांबरोबरच ज्येष्ठ मंडळीही मॉर्निंग वाकसाठी बाहेर पडतायत. बगीच्यांमध्ये सकाळी चालण्यास येणार्‍याची गर्दी दिसतेय. 12 अंश सेल्सिअस तापमान झाल्याने पुण्याची गुलाबी थंडीने वातावरण प्रसन्न झालंय.

नाशिकचा पारा 6 वर

राज्यभरात थंडीची लाट पसरलीये. सर्वाधिक कमी तापमानाची नोंदही नाशिकमध्ये झालीये. नाशिकमध्ये 6 अंश सेल्सियसवर कायम आहे. हिवाळ्यात नाशिकचे तापमान सर्वाधिक कमी होत असते. 2012 ला सर्वाधिक कमी 2.8 सेल्सियस तापमानाची नोंद झालीये. कडाक्याच्या थंडीमुळे द्राश्र बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक सध्या चिंतेत आहे.

आजचं तापमान
मुंबई (कुलाबा) 11.6
सांताक्रुझ 11.6
रत्नागिरी 15.5
पणजी (गोवा) 20.5
पुणे 9.8
जळगाव 10.0
कोल्हापूर 18.0
महाबळेश्वर 14.0
मालेगांव 10.2
नाशिक 6.0
सांगली 15.7
सातारा 12.5
सोलापूर 16.7
उस्मानाबाद 13.9
औरंगाबाद 13.0
परभणी 14.2
नांदेड 10.0
अकोला 11.7
अमरावती 13.0
बुलडाणा 13.6
ब्रह्मपुरी 19.0
चंद्रपूर 18.6
गोंदिया 16.7
नागपूर 18.1
वाशिम 19.0
वर्धा 17.0
यवतमाळ 15.0

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close