पत्नीची छेड काढणार्‍या तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या

December 24, 2015 10:01 AM0 commentsViews:

thane crime sences24 डिसेंबर : मुंबईमधील चुनाभट्टीमध्ये एका तरुणानं आपल्या पत्नीची छेड काढणार्‍या एका युवकाची भर रस्त्यामध्ये कोयत्यानं वार करून हत्या केलीये. त्यानंतर पळून न जाता तो स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला अटक केलीये. श्रीनिवास लक्का असं त्याचं नाव आहे.

श्रीनिवास चुनाभट्टीमधल्या आझाद गल्लीत पत्नीसोबत गेल्या 6 महिन्यांपासून राहत होता. त्याच परिसरात राहणारा मनोज सरकन्या हा गेल्या 2-3 महिन्यांपासून श्रीनिवासच्या पत्नीकडे वाईट नजरेनं बघत होता, नंतर तिची छेड काढायलाही त्यानं सुरुवात केली.

त्यावरून श्रीनिवासनं मनोजला समजावलंही होती. पण मनोजनं आपला उद्योग सुरूच ठेवला. त्यामुळे संतापलेल्या श्रीनिवासनं मंगळवारी संध्याकाळी रस्त्यातच मनोजच्या मानेवर, हातावर आणि पूर्ण शरीरावर कोयत्यानं 17 वार केले. त्यात मनोज जागीच ठार झाला. हत्येनंतर श्रीनिवास याने स्वतःहा चुनाभट्टी पोलिसांत जाऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी श्रीनिवासला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय नायकवाडी यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close